सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात योगा आणि प्राणायाम शिबिर आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून भारतीय योग संस्थानचे क्षेत्र आणि प्रसिद्ध योग प्रशिक्षक प्रधान सोहन मंत्री यांना निमंत्रित करण्यात आले होते. सोहन मंत्री यांनी प्राणायाम व विविध योगासने यांचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यांनी बैठक स्थितीतील व दंड स्थितीतील आसने, आसनांचे महत्त्व, ओंकार, प्रार्थना यासह प्रात्यक्षिके घेतली. निरोगी स्वास्थ्य जपण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगा व प्राणायाम यांचा अवलंब आपल्या जीवनात केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
किरण अग्रवाल, व गोविंद जानकर यांनी यावेळी डेमॉन्स्ट्रेशन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. व्ही. एन. शिंदे,रासेयो जिल्हा समनव्यक डॉ. सविता कुलकर्णी, शा. शि. संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ, , प्रा. सचिनकुमार शहा, डॉ. धीरज देशमुख, प्रा. सागर बराटे आदी शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी, यांनी केले तर आभार डॉ. धीरज देशमुख यांनी मानले.


إرسال تعليق