रणजित दुपारगोडे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : दि. ९ /७/२०२३ रोजी दलित पॅंथर पुणे शहराच्या वतीने सावित्रीबाई फुले स्मारक सांस्कृतिक भवन येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व संस्थापक पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून १९७२ दलित पॅंथरच्या ५१ व्या वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या हस्ते दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे यांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ घनश्याम भोसले यांना अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष यांच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मान्यवर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, राजेशजी सोनवणे, राष्ट्रीय सरचिटणीस जगदीश भाई इंगळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुभाष लाठकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अरविंद मोरे, केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर घनश्याम भोसले, कविताताई भोंडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिला आघाडी, रमाताई आहिरे महाराष्ट्र सरचिटणीस महिला आघाडी, प्रमोदजी लोखंडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, अर्जुन शिंगे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, अरविंद धुळेकर महाराष्ट्र उपाध्यक्ष, रोहित अहिवळे महाराष्ट्र सरचिटणीस, मुंबई प्रदेशाध्यक्ष रोहित भंडारी, सुनील गायकवाड महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख पत्रकार जयवंत कांबळे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आव्हाडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष आकाश भोंडे, पुणे शहराध्यक्ष संजय नडगेरी, अतुल पवार पुणे शहर उपाध्यक्ष, परशुराम कुंभार पुणे शहर सचिव, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मिलिंद भाऊ गायकवाड, पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी रेखाताई सूर्यवंशी, अनिता गायकवाड पुणे शहराध्यक्ष, अनुराधा पुणे शहर संघटक, सामीना शेख हडपसर विधानसभा अध्यक्ष महिला आघाडी, बाळासाहेब पवळे हडपसर विधानसभा अध्यक्ष, बाबू होळीकेरी व दलित पॅंथरचे पुणे जिल्हा शहर राज्यातील प्रमुख पदाधिकारी व महिला आघाडी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी घोषणा केले की जिथे जिथे अन्याय होईल तिथे अन्याविरोधात राज्यभर दलित पॅंथर संघटना सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार. तसेच महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष डॉ घनश्याम भोसले यांनी देखील घोषणा केली की महाराष्ट्रातील आश्रम शाळेला लवकरात लवकर अनुदान मिळाले पाहिजे आणि केंद्रीय व महाराष्ट्राचे प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त करत संघटना व संघटन येणार्या काळात मजबूत करणार खेडोपाडी, घाव, तालुका, शहर या ठिकाणी नवनियुक्त्या येणार्या काळात करण्यात येतील. दलित पॅथरची उभारणी नामदेव ढसाळ यांच्या विचारांशी निगडित असून त्याच पध्दतीने कार्यकर्ते यांना बळ देण्याचे कार्य करेल.


إرسال تعليق