शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी सकारात्मक चर्चा : अतुल खुपसे -पाटील यांनी घेतली खा.सुप्रिया सुळे यांची भेट


 धनंजय काळे

महाराष्ट्र पोलीस न्यूज 


सोलापूर (माढा) : राज्यात नाट्यमय घडामोडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये पडलेली उभी फूट या अनुषंगाने राज्यात शरद पवार व अजित पवार असा संघर्ष जनतेला पाहायला मिळतोय.

            याच पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा इरादा पक्का करत आज मुंबई येथील वाय बी सेंटर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तर सिल्वर ओक येथे खा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असून सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती अतुल खूपसे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

         शरद पवार आजही बांधावर उतरून शेतकऱ्यांची आपुलकीने विचारपूस करतात. त्यामुळे आपण राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असे सांगून आज सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह येथे खा. शरद पवार यांच्याशी शेती, पाणी, पाऊस आणि सोलापूर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली.

            सायंकाळी ५ वाजता खा. सुप्रिया सुळे यांच्याशी अतुल खूपसे पाटील व कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा झाली. या दरम्यान लवकरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व प्रचार प्रमुख खा. अमोल कोल्हे यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवू असे आश्वासन सुळे यांनी दिले असल्याची माहिती खूपसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

            यावेळी विनिता बर्फ, रोहण नाईकनवरे, हर्षवर्धन पाटील, शर्मिला नलावडे, निखिल नागणे, भारती  पाटसकर, विशाल पाटसकर, केशव लोखंडे यांच्यासह जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم