शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

'सैनिक हो तुमच्यासाठी' कार्यक्रमाला जिल्ह्यातील सैनिक, माजी सैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 


सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : 'सैनिक हो तुमच्यासाठी' या राज्य शासनाच्या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कार्यरत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

                  या कार्यक्रमात महसूल कार्यालयाकडून देण्यात येणार विविध दाखले, प्रमाणपत्रे यांचे आजी माजी सैनिकांना वाटप करण्यात येणार असून घर, शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे, समस्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहिद झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांना व शौर्य पदक धारकांना जमीन वाटपाची  प्रलंबित  प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील.

             'सैनिक हो तुमच्यासाठी' या कार्यक्रमात आपल्या समस्या निकाली काढण्यासाठी लेखी अर्जासह संबंधित तालुक्याच्या तहसिल कार्यालयात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) एस. डी. हंगे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم