हाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : ,पुर्व हवेलीतील लोणी काळभोर येथील एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी चारवाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे.
आकाश केशव झेंडे (वय २२, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबाब नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश झेंडे हा त्याच्या आई व भावाबरोबर राहत होता. शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या घरी कोणी नसताना त्याने घरात आत्महत्या केल्याचे त्याच्या आईला निदर्शनास आले. त्याला तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे सांगितले.
दरम्यान, आकाश झेंडे याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र आकाश याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.

إرسال تعليق