सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : रिक्षात बसवून फिरवून आणण्याचा बहाणा करुन एका रिक्षाचालकाने ११ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत नुकतीच उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रिक्षा चालकाच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश परडे (रा. उरुळी कांचन ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदरचा प्रकार एप्रिल २०२३ मध्ये घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ११ वर्षाची मुलगी आहे. तर आरोपी अविनाश परडे याने मुलीला दोन ते तीन वेळा रिक्षात बसवून भुलेश्वर या ठिकाणी फिरायला घेऊन जायचे आमिष दाखवले. सदर ठिकाणी असलेल्या येथील झाडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
सदर घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितले. तेव्हा पिडीत मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर फिर्यादी यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपी अविनाश परडे याच्याविरोधात तक्रार दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्याने (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.

إرسال تعليق