सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : जन्मदाते आई वडील सर्व प्रथम आपले गुरू असतात. तसेच शाळा महाविद्यालयीन जीवनात सखोल ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करायला शिकविणारे शिक्षक आपले दुसरे गुरू असतात त्यांचा आयुष्यभर आदराने सन्मान करणे हा त्यांनीच शिकविलेला एक संस्कार आहे. असे अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर यांनी सांगितले.
संस्थेच्या वतीने के.के.घुले विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांचा सत्कार व गरजु विद्यार्थांना वह्या पेन वाटप करण्यात आले.
यावेळी मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच शिवराज घुले, माजी उपसरपंच समीर घुले, विठ्ठलराव भापकर, पांडूरंग घुले, अनुराधा माने, दिलीप घुले, मोहन घुले, मसा जाधव, गोरख आडेकर, दिपक घुले उपस्थित होते.
बेल्हेकर पुढे म्हणाले विद्यार्थांना कोणत्याही क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणजे गुरूंचे मागदर्शन घेण्याची गरज असते तरच ते यशस्वी होतील. या कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य एस.एस.पाटील, पर्यवेक्षक सतिश हाके, प्रज्ञा झगडे, प्राजक्ता वाघ यांनी केले.


إرسال تعليق