शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

स्पाय कॅमेरा वापरुन करायचे एटी एम मधील पैश्याची चोरी : इंदापुर


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज



पुणे (इंदापूर) : बस स्थानकातील इंडिकॅश कंपनीचे दोन एटीएम फोडून १७ लाख ५५ हजारांची रोख रक्कम चोरणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बेड्या ठोकल्या.

            रचपाल बलदेव सिंह (वय ३६ वर्षे, रा. बाबा दिपसिंग नगर, रोड नंबर १, भंटिडा, पंजाब) आणि लखवीर बलदेव सिंह (वय २९ वर्षे, रा. रायखाना, ता. तलवंडी सापो, जि. भंटिंडा, पंजाब) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांना इंदापूर पोलिसांनी त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. 

        पुणे जिल्ह्यातील सुपे बारामती, तळेगाव पुणे, तर गोवंडी मुंबई, राजस्थानातील गंगापूर, कोटा, पंजाबमधील पठाणकोट आणि उत्तराखंड राज्यात ही गुन्हे केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

           इंदापूर न्यायालयाने या दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

             सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, सफौ. प्रकाश माने, पो.हवा. ज्ञानेश्वर जाधव, पोलीस नाईक सलमान खान, पोलीस कॉन्टेबल नंदू जाधव, गजानन वानोळे, होम. संग्राम माने यांनी केली असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم