शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लाईटच्या खांबाचा करंट लागल्याने एका ५ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : इंदापूर शहरातील दर्गा मस्जिद चौकातील लाईटच्या खांबात विद्युतप्रवाह उतरल्याने  एका ५ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दि. ६ /७/२०२३रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडलेली असुन कुलसूम हैदर मुशाहिदी असे या मुलीचे नाव सांगण्यात येत असून या संदर्भात इंदापुर पोलिस स्टेशन आवारात नागरीक एकत्रीत येऊन या घटनेस जबाबदार असनारे महावितरण आणि नगरपरिषद यांचेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

           या घटनेत चिमुकलीचा कान आणि पाठीला जखम झाली आहे. घटना घडल्यानंतर महावितरणने संबंधित ठिकाणचे लाईट कनेक्शन बंद केले आहे, तपासणीअंती खांबाला करंट असल्याचे निष्पन्न झाल्याचे नागरिक सांगत आहेत.

          चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरातील नागरिकांमध्ये महावितरण आणि नगरपरिषदेच्या विरोधात संताप व्यक्त करताना दिसून येत आहे. संतप्त घटनेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संबंधित महावितरण आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم