सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या. देत कवडीपाठ येथील स्वामी समर्थ हाॅस्पिटलचे डॉ. सुनिल गायकवाड यांनी एका अनोख्या गोष्टींचा उपक्रम केला.
१५/०८/२०२२ रोजी स्वामी समर्थ हॉस्पिटल मध्ये पहिली प्रसूती करण्यात आली त्याच अनुषंगाने त्या बाळाचा पहिला वाढदिवस स्वामी समर्थ हाॅस्पिटलचे मध्ये साजरा करण्यात आला.
वाढदिवस साजरा करत असताना त्याच बाळाच्या हस्ते दिनांक ११/०८/२०२३ रोजी स्वामी समर्थ हाॅस्पिटलचे मधील जुळे जन्मलेल्या बाळांना भेट वस्तू हाॅस्पिटलच्या वतीने देण्यात आल्या. हा दुग्ध सरकार योग डॉ. सुनिल गायकवाड यांनी घडून आणला. या अनोख्या उपक्रमाने कवडीपाठ परिसरात नागरिकांनी हाॅस्पिटलचे व डॉ. गायकवाड यांचे कौतुक केले.
स्वामी समर्थ हाॅस्पिटलचे डॉ. सुनिल गायकवाड यांनी पुढील काळात असे नव नवीन उपक्रम स्वामी समर्थ हाॅस्पिटलच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले.





إرسال تعليق