शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

स्वातंत्र्य दिनानिमित्त रामदरा येथे वृक्षारोपण- ग्रीन फाऊंडेशन


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 

 

पुणे (हवेली) : लोणी काळभोर - १५ ऑगस्ट रोजी भारत आपल्या ७७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे या अनुषंगानेच ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने लोणी काळभोर येथील तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर डोंगर परिसरात ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग यांच्या वतीने ७७ वावळा वृक्षांचे रोपन ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांच्या शुभहस्ते लावण्यात आली.

               यावेळी ग्रीन फाऊंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख विनोद यादव, रमेश बिंड,जीवन जाधव, बिरूदेव भास्कर, अभिषेक शेंडगे, दादासाहेब कोळपे ,सचिन महानवर, भाऊसाहेब कोळपे,नितीन सदाम काळभोर उपस्थित होते.

               स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो अशी महिती ग्रीन फाउंडेशन हवेली तालुका संपर्क प्रमुख विनोद यादव यांनी दिली

Post a Comment

أحدث أقدم