शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ओबीसी आणि ईडब्लूएसमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी सरकार भरणार, मराठा उपसमितीच्या बैठकीत निर्णय


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 



मुंबई : मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

             ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण फी राज्य सरकारच भरणार आहे. आतापर्यंत एससी आणि एसटी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी राज्य सरकारतर्फे भरण्यात येत होती. पण आता ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांची फी देखील सरकार भरणार आहे. मराठा उपसमितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

          दरम्यान हा निर्णय पुढे राज्यमंत्री मंडळाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Post a Comment

أحدث أقدم