सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻तलाठी, मंडलाधिकारी व्यतिरिक्त खाजगी व्यक्ती हाताळतात सातबारा
👉🏻हवेली तहसीलदार किरण सुरवशे यांच्याकडून खाजगी व्यक्ती वर कारवाई करणार का?
👉🏻हवेली तहसीलदार यांच्या परिपत्रकाला कार्यालय, मंडलाधिकारी व तलाठी यांच्याकडून केराची टोपली
पुणे (हवेली) : तलाठी , मंडलाधिकारी व इतर शासकीय कार्यालयात खाजगी व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार नाही असे. हवेलीचे तहसीलदार किरण सुरवशे यांनी परिपत्रकांद्वारे हवेली कार्यक्षेत्रात येत असलेल्या सर्व तलाठी मंडलाधिकारी व अधिकारी यांना परिपत्रकाच्या माध्यमातून हवेलीचे तहसीलदार किरण सुरवशे यांनी स्पष्ट उल्लेख केला
परंतु असा आदेश गेली दोन महिन्यांपासून असतानाही तलाठी, मंडलाधिकारी व इतर कार्यालयात खाजगी व्यक्ती काम करत आहेत. असे हवेलीतील शेतकरी व नागरिकांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
पुर्व हवेलीतील लोणी काळभोर वगळता इतर सर्व ठिकाणी खाजगी कामगार काम करतात असे शेतकरी खाजगीत बोलत आहेत. हवेली तहसीलदार किरण सुरवशे यांनी काढलेल्या परिपत्रकाच्या आदेशाचे पालन होत नसेल तर संबंधित तलाठी / मंडल अधिकारी यांच्या वर तहसीलदार किरण सुरवशे निलंबनाची कारवाई करण्यात का? असा प्रश्न शेतकरी वर्गातून केला जात आहे. सोरतापवाडी तलाठी निवृत्ती गवारे यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क साधला असता आम्हाला कुठलेही परिपत्रक मिळाले नाही. यावरून असे दिसते आहे की तहसीलदार यांच्या आदेशाचे सरासर उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
तहसीलदार किरण सुरवशे यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयावर संबंधित हवेलीतील तलाठी, मंडलाधिकारी यांनी परिपत्रकाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने जाणवत आहे. शेतकरी/नागरिक पुढील कारवाई संबंधितांवर होणार का? शेतकऱ्यांच्या आशेचा किरण विझणार का? येणार काळच ठरवेल.
प्रतिक्रिया
👉🏻किरण सुरवशे (हवेली तहसीलदार)
परिपत्रक काढले आहे. परिपत्रक नायब तहसीलदार यांना सर्व कार्यालयात अमंलबजावणी साठी पाठवण्यात आले आहे. आदेशाचे दखल व दिरंगाई करणार्या संबंधितावर कडक कारवाई / निलंबन करणार....
👉🏻निवृत्ती गवारे तलाठी (सोरतापवाडी, नायगाव)
असे कुठलेही परिपत्रक आम्हाला मिळाले नाही. किंवा तसा आदेश आलेला नाही. आमच्या कार्यालयात खाजगी कामगार आहेत. तसे सर्वच कार्यालयात खाजगी व्यक्ती आहेत. त्यात वेगळे काय.?
प्रविण सोनवणे (कोतवाल संघटना हवेली अध्यक्ष)
शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची देखभाल कोतवाल करता आता तसे होत नाही. येणार्या काळात कोतवाल संघटना सर्वे करून खाजगी व्यक्तीच्या हाती शेतकऱ्यांचे सातबारा सुरक्षित नसल्याचा अहवाल शासनाला देणार.


إرسال تعليق