शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नववर्षाला भारतात सर्वाधिक मद्य कुठल्या राज्यात पितात? जाणून घ्या सविस्तर


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


मुंबई : २०२४ या नवर्षाला अवघे काही दिवस उरले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी मद्य विक्री व  रेस्टॉरंटसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. 

               अशा परिस्थितीत ज्या राज्यांमध्ये लोक मद्य पितात तेथे मद्याची विक्री वाढणार आहे. कारण दरवर्षी लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी करोडोंची मद्य खरेदी करतात. 

          

                         नववर्षाच्या कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक मद्य खरेदी करतात


            २०२३ या नववर्षाच्या स्वागतावेळी राजस्थानमध्ये सर्वाधिक मद्य प्यायली गेली. ३० आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी येथे ३५.२६  कोटी रुपयांची मद्य विकली गेली. एकट्या जयपूरमध्ये या दोन दिवसांत ११ कोटी रुपयांची मद्य विकली गेली. दिल्ली मध्ये तर ३१ डिसेंबर २०२२ रोजी ९ कोटी. रुपयांची मद्य विकली होती. तर, २०२१ मधील या दोन दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार, ३० आणि ३१ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये ७७ कोटी ८२ लाख रुपयांची मद्य विकली गेली.

               आर्थिक संशोधन संस्था ICRIER आणि कायदा सल्लागार कंपनी PLR चेंबर्सच्या अहवालानुसार, भारतात सुमारे १६ कोटी लोक मद्य पितात. या संख्येपैकी ९५ टक्के पुरुष आहेत. या पुरुषांचे वय १८ ते ४९ या दरम्यान आहे. याशिवाय या संख्येतील पाच टक्के महिला मद्याचे सेवन करतात.


                                 कोणत्या राज्यात नागरिक सर्वाधिक मद्य पितात जाणून घेऊया 


           क्रिसिल नावाच्या सर्वेक्षण कंपनीने २०२० मध्ये संपूर्ण देशात सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, २०२० मध्ये भारतातील पाच राज्ये अशी होती जिथे दारूचे सर्वाधिक सेवन केले जाते. यामध्ये छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर होता. येथील एकूण लोकसंख्ये पैकी ३५.५ टक्के लोक दारू पितात. त्रिपुरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्ये पैकी ३४.७ टक्के लोक दारू पितात. तर आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्ये पैकी३४.५ टक्के लोक नियमितपणे दारू पितात.

Post a Comment

أحدث أقدم