अतुल सोनकांबळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : (दि २६.) मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तहसील कचेरीत (दि.२६) पासून आश्रमशाळा सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे त्यांनी मुलाखतीत पत्रकारांना दिली.
मखरे पुढे म्हणाले की, संस्थेअंतर्गत एकूण ३६८ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत, परंतु शासन अनुदानित आश्रमशाळा वसतिगृहांना नारी निकेतन योजनेतून अल्प दरात देत असणारे धान्य (गहू, तांदूळ) माहे - ऑक्टोबर - २०२३ पासून अद्याप पर्यंत मिळाले नाही. शासनाला संस्थेच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊन तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणे, धरणे आंदोलने करुन देखील मा. तहसीलदार इंदापूर यांचेकडून फक्त आश्वासनं दिली जातात.
त्यामुळे दि.२६/१२/२०२३ पासून तहसील कचेरीत कार्यालयीन वेळेत आश्रमशाळा सुरु करण्यात आली आहे. नारी निकेतन योजनेतील धान्य मिळेपर्यंत आश्रमशाळा सुरुच राहील असे संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे. यावेळी संस्था अध्यक्ष शकुंतला मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे आदी उपस्थित होते.


إرسال تعليق