शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

खासदार सुप्रिया सुळे यांची वनसाळे यांच्या घरी सदिच्छा भेट


 

गजानन टिंगरे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


 पुणे (बारामती) : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी "मी आंबेडकरवादी" सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा साद फाऊंडेशन इंदापूर या चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष सुरज वनसाळे व सामाजिक कार्यकर्ते क्षितीज वनसाळे यांच्या इंदापूर तालुक्यातील नऊदारे (लासुर्णे) येथील घरी सदिच्छा भेट दिली.



            गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरज वनसाळे यांच्या आई कालकथीत शालीनी रामचंद्र वनसाळे यांचे तीव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा सोनाई ग्रुपचे प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ, लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा) लोंढे हे उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم