शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

उरुळी कांचन येथे शाळेच्या गेटबाहेरच दोन गटात तूफान राडा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल ;


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील एका शाळेच्या गेटबाहेर दोन अल्पवयीन गटातील २० ते २५ जणांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. स्वामी विवेकानंद अकॅडमी शाळेच्या गेटसमोर बुधवारी (ता. २७) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. 

             उरुळी कांचन परिसरात वारंवार होत असलेल्या घटनेमुळे लोणी काळभोर पोलिसांची गस्त वाढवण्याची गरज आहे असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

                 मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळेच्या गेटसमोर पांढरस्थळ परिसराकडे जाणाऱ्या दोन अल्पवयीन गटांमध्ये अचानक मारहाण सुरु झाली.

              यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही चालकांसह नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेत आपापल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात नागरिक दंग होते. या घटनेची पोलिसांना माहिती न देता केवळ बघ्याची भूमिका घेऊन मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यास नागरिकांनी दंग होते.



                 या मारहाण झालेल्याचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा गोंधळ झाला. मात्र, या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्या ठिकाणी कोणीही आढळून आले नाही. या मारहाणीचे कारण

अद्यापही समोर आले नाही. महाविद्यालयीन परिसरात दोन गटांत सातत्याने वाद होत आहेत. मागील १५ दिवसांपूर्वी महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरही अशाच प्रकाराचा वाद झाला होता.

              स्वामी विवेकानंद अकॅडमी या शाळेत मागील तीन दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत. शाळेचा आज स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाने शेवट होता. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी व त्यांचे पालक कार्यक्रमामध्ये दंग ‌होते. या घटनेतील मुलांचा शाळेशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शाळेतील एका व्यक्तीने सांगितले.

          रस्त्यात हाणामारीच्या घटनेने परिसरतील नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून करण्यात येत आहे. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड  वायरल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم