शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुंबई ते कासदरम्यान बाईक राइडसह कास जंगल ट्रेकिंग व जंगल सफर : द मिस्टिक वंडरर्स बाइक रायडर ग्रुप, मोटारसायकल राइड क्लबचा अनोखा उपक्रम


 चांगदेव काळेल )प्रतिनिधी)

महाराष्ट्रा पोलिस न्यूज                        


सातारा : 'रिस्पॉन्सिबल टुरिझम' व 'पर्यावरण जनजागृती' ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासह पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी द मिस्टिक वंडरर्स बाइक रायडर ग्रुप,  राइड क्लब yani ठाणे पासून सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कास पठारापर्यंत मोटारसायकल राइड व पुढे कास घनदाट जंगल परिसरात ट्रेकिंग व जंगल सफर आयोजित करून पर्यावरणपर अनोख्या जनजागृतीविषयक उपक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. 

             द मिस्टिक वंडर्स यांच्या ठाणे क्लब ऑफिस पासून सुरू झालेली ही बाइक राईड मोहिम ६२० किलो मीटरचा प्रवास करून सातारा जिल्ह्यातील जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या कास पठारपर्यंत नेण्यात आली. 

         द मिस्टिक मोटार सायकल राइड क्लबचे प्रमुख सागर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या बाईक राईडमध्ये प्रतिक पूरत, अशोक पोपळकर, रोहन गोखले या प्रमुख रोड मास्टर सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल क्रूजर म्हणून संतोष परब, उमेश कुमार, आशिष जयस्वाल, संकेत सुर्वे, अमर कांबळे, चारुदत्त ठणगे तर अँकर रायडर म्हणून राजेंद्र सरदल व सागर मोहिते यांचा समावेश होता, याशिवाय रुपेश चेलानी, अमर हरेर, संदीप पटेल, प्रवीण पाटील, अशोक डालोर यांनी कार मेंबर्स म्हणून या मोहिमेत सहभाग घेतला. 

            कास पठारावर रायडर्स मोहिमेचा समारोप झाल्यावर मधुमकरंद गडाच्या पश्चिमेस घनदाट जंगलात एडवेंचर आर्मी ट्रेकर्स असोसिएशनचे सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्हान्स ट्रेकिंग कॅम्प व जंगलसफर मोहीम संपन्न केली. त्यामध्ये वनस्पतींचा व जंगली घटकांचा अभ्यास, वन्यप्राण्यांचे दर्शन व त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवणे यांचा समावेश होता. राईड मोहीम व जंगल कॅम्प मध्ये १६ दुचाकीस्वारांसह २० सदस्यांनी सहभाग घेतला होता. क्लबतर्फे नेहमी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात व अन्य राज्यातही विविध प्रकारांचे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात.

        ‌   सामाजिक बांधिलकीतून क्लबतर्फे सातत्याने विविध उपक्रम यशस्वी केले जातात. तसेच पर्यावरण जनजागृती ऐतिहासिक स्थळांबाबत माहिती नव्या पिढीला करून देणे, इतिहासाबद्दल अभिमान बाळगणाऱ्या उपक्रमांचे संयोजन करणे, जंगल सफारी व गिर्यारोहण मोहिमा यांचे आयोजन करण्यातही या क्लबचा पुढाकार असतो. कोरोनाकाळात मुंबईच्या डबेवाल्यांनाही क्लबने आर्थिक मदत केली होती

Post a Comment

أحدث أقدم