सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कदमवाकवस्ती येथील LOCL, HPCL, BPCL वितरक डेपो मधील टॅंकर चालक यांनी काम बंद आंदोलन केले होते.
परंतु लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या तत्परतेमुळे काम बंद आंदोलन संपले.
टॅंकर चालक हे पेट्रोल व डिझेलची वाहतूक करणार नाही असं समजताच ०१/०१/२०२४ रोजी भारत सरकार कडून मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आलेल्या शिक्षेमधील दुरुस्तीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील IOCL, HPCL, BPCL या पेट्रोल व डिझेलसाठा व वितरण डेपो मधील टँकर चालक यांनी सकाळ पासून पेट्रोल डिझेलची वाहतूक टँकर द्वारे करणार नाही अशी भूमिका घेऊन काम बंद आंदोलन सुरू केले होते.
त्या अनुषंगाने अश्विनी राख सहायक पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे, शशिकांत चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे यांनी वरील तीनही कंपनीच्या ठिकाणी जाऊन संपकरी टँकर चालक यांना मोटार वाहन कायद्यातील दुरूस्ती बाबत आसलेल्या शंकाचे निरसन केले.
तसेच त्यांना पेट्रोल डिझेल वाहतूक तातडीच्या सेवेत असल्याचे समजावले व तात्काळ टँकर भरणेस सुरु करण्याबात सांगितले असता त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व टँकर चालक यांनी आपापले टँकर कंपन्यांमध्ये भरण्यास चालू केले असून काम बंद आंदोलन मागे घेतले असून डिझेल पेट्रोल टॅंकरची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
तसेच वरील नमुद तीनही डिझेल व पेट्रोल साठा वितरण डेपोच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.




إرسال تعليق