शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पोलिसांनी जळीत महिलेचे ठिकाण बदलल्याचाच केला पुराव्यानिशी पर्दाफाश .....पत्रकारांनी पत्रकार परिषद घेत केली जळीत प्रकरणाची पोलखोल उघड.....


 अतुल सोनकांबळे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापूर) : पोलीस स्टेशनच्या आवारात एका महिलेने आत्मदहन केले. या प्रकरणात आत्मदहन पोलीस स्टेशनच्या बाहेर झाल्याचे दाखवून सत्य दडपून उलट वार्तांकन केलेल्या पत्रकारांवरच गुन्हा दाखल केला. मात्र आमच्याकडे त्या महिलेचा मृत्यू पूर्व जबाबाचा पुरावाच असून आत्मदहन केलेले ठिकाण बदलल्याचा प्रकार झाल्याची माहिती पत्रकार जितेंद्र जाधव व इम्तियाज मुलाणी यांनी पत्रकार परिषदेत करून या जळीत प्रकरणाची पोलखोल उघड केली.

            बुधवार दि. ३ जानेवारी रोजी इंदापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. 

          यावेळी पत्रकार जाधव व  मुलाणी  यांनी सांगितले की, आपली समस्या घेऊन एक माता माऊली इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात या पूर्वीही अनेकदा येऊन गेल्याचे काहींनी सांगितले. मात्र तिला न्याय दिला नाही तिने १६ नोव्हेंबरला मनाचा इरादा पक्का करून महिला पोलीस स्टेशनच्या आवारात गेली आणि तिने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला हा घडलेल्या घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. मात्र त्यामध्ये त्या जखमी महिलेला रुग्णवाहिकेतुन न नेता पोलिसांच्या वाहनातून तिला शेजारीच असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. ज्या ठिकाणी तिने आत्मदहन केले ती जागा, त्या जळालेल्या महिलेला विझवण्यासाठी वापरलेले चादर,तिच्या अंगावरील कपड्यांचे तुकडे, मांसाचे छोटे छोटे तुकडे आणि इतर सर्व पुरावे पाणी मारून नष्ट करण्यात आले. आम्ही वार्तांकनासाठी गेल्यानंतर घटनास्थळ आणि इतर बाबींची खात्री पटल्यानंतरच सदर घटनेची बातमी प्रसिद्ध केली.

           सदर घडलेल्या घटनेची बातमीच का केली म्हणून राग मनात धरून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार यांनी बदनामी केल्याचा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल केला.  यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी घडलेली घटना देखील इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात घडलेली नसून ती पोलीस स्टेशनच्या बाहेर कालठण रोडवर झाल्याचे दाखवत घटनास्थळ बदलले. आम्ही संपूर्ण रोडवर काही खाना-खुणा पाहण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या दिसून आल्या नाहीत. आमच्याकडे त्या महिलेचा मृत्यू पूर्व जबाब असून महिलेने ज्या ठिकाणी आत्मदहन केले ते ठिकाण देखील चित्रफिती द्वारे संकलित केलेली आहे. वेळप्रसंगी आम्ही तो न्यायालयात सादर करणारच आहोत. मात्र, इंदापूरच्या पोलिस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार यांनी आमच्यावर जाणीवपूर्वक द्वेषापोटी आणि बदनामीसाठी सत्य घटना दडपण्यासाठी हा खटाटोप केलेला आहे. असा आमचा आरोप असून जो पर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या पत्रकाराने जर खरेखुरे वार्तांकन केले तर त्यांच्यावरती अशी वेळ येते ही वेळ कोणत्याही पत्रकारावरती येऊ नये यासाठीच पत्रकार परिषद आयोजित केली आणि संपूर्ण खुलासा केला आहे. सत्य- असत्य हे न्यायदेवता ठरवते. मात्र, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही सत्य मांडत आलोय मांडणारच आणि पुढील काळात मांडतच राहु.

           या पत्रकारांवर झालेल्या अन्यायाबाबत राज्य पातळीवरील विविध पत्रकार संघटना देखिल आक्रमक झाल्या आहेत. असे जितेंद्र जाधव व इम्तिहाज मुलाणी म्हणाले.

         इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी ...!!  केवळ वार्तांकन केलेल्या रोषातून गुन्हा दाखल केलेल्या इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप शिशुपाल पवार यांच्यावर पोलीस अधीक्षकांनी घटनेचे सत्यता पडताळून गांभीर्य लक्षात घेता व मिरीट चा विचार न करता तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करत गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी उपस्थित पत्रकारांनी केली.

Post a Comment

أحدث أقدم