शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अयोध्येतील श्री राम प्राण प्रतिष्ठान निमित्ताने ग्रामदेवताची पुजा, भजन व दिपोत्सव साजरा : भवरापूर


 पोपट साठे (ग्राहक प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : आयोध्या मध्ये चालू असलेला श्रीराम प्राणप्रतिष्ठांनी निमित्त हवेली  तालुक्यातील भवरापूर मधील छोट्याशी गावांमध्ये पहाटे पासून ग्रामदैवताची पुजा करुन श्री राम प्रतिष्ठापणाच्या  सोहळ्यासाठी संपूर्ण गाव एकवटले

            पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोकसंख्येने कमी असलेल्या भवरापूर या छोट्याशा गावामध्ये २२ तारखेला पहाटेपासून पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विशेषता गावातील ग्रामस्थांनी ग्रामदैवतांची महापूजा करून भजन, आरती, अन्नप्रसाद, दिपोत्सव, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. व सायंकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ यांच्या भराडाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली सर्व ग्रामस्थांनी भजनी मंडळांनी व भाविक भक्तांनी अतिशय उत्साहाने कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला. भवरापूर येथील महिलांनी दीपोत्सवामध्ये अत्यंत आनंदाने भाग घेतला. असे सुंदर नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व या अविस्मरणीय कार्यक्रमात समस्त भवरापूर येथील ग्रामस्थांनी जय श्रीरामाच्या  जय घोषाने परिसर दणाणून सोडला.

Post a Comment

أحدث أقدم