सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : लोणी काळभोर पोलिसांचा कारनामा, पोलीसांना काळीमा फासणारी दुर्दैवी घटना लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे घडली.
चोर, दरोडेखोरांना मोठ्या शिताफिने व जिवावर उदार होऊन पकडणाऱ्या खर्या पोलिसाना लाजीरवाणी घटना काही भामटे स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच पोलिस ठाण्यात चोरी करतात तेव्हा नागरिकांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. जर पोलीस चोरी करतात. त्या पोलीसांना दरोडा टाकला म्हणायचे का? असा धक्कादायक प्रकार शहर पोलिस दलाअंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी ४ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे अशी निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
सोमवारी या ४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलीस उपायुक्त यांनी काढली. मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला यात पोलिसांनी बाळासाहेब घाडगे उर्फ बाळू (झिरो पोलीस) या आरोपीला अटक केली होती. या आरोपीकडे चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच काही दुचाकी परस्पर विकायला सांगितले, अशी कबुली दिली. तसेच या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलीस कर्मचारी यांनी आरोपीला त्या बाजारात विकण्यास सांगितले. असे झिरो पोलीस घाडगे यांनी सांगितले.
स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीला हे कृत्य करण्यास भाग पाडले. वेळोवेळी या पोलीस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, त्यांनी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे.

إرسال تعليق