शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण व प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहोळ्याच्या निमित्ताने आनंदनगर - जंक्शन मध्ये सोहळा आयोजित


 गजानन टिंगरे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (इंदापूर) : श्रीरामोत्सव आनंदनगर-जंक्शन पंचक्रोशीतील बहुसंख्य रामभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रचंड उत्साहात संपन्न झाला.

          आनंद नगर मधील श्री दत्त मंदिर येथे  सकाळी ११ वा. भजन, दुपारी १२:३० ला मंगल अक्षता वाहून महाआरती व प्रसाद वाटप तर संध्याकाळी आनंदनगर मधील श्रीपाद सेवा ध्यान मंदिर येथे रामरक्षा व मारुती स्तोत्र पठण अणि भव्य शोभा यात्रेचे व महा प्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले.



            शोभा यात्रेनिमित्त नागरिकांनी दारासमोर व रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी, दिव्यांची सजावट करून घरावर भगवे ध्वज लावले होते. शोभा यात्रेच्या समारोपानंतर परिसरातील कार सेवकांचा सत्कार व शोभेच्या फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी करण्यात आली.

            या उत्सवासाठी आनंदनगर-जंक्शन मधील सर्व नागरीक, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व वालचंदनगर पोलीस स्टेशन चे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



Post a Comment

أحدث أقدم