सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : महाराष्ट्र राज्य निवडणूक साक्षरता मंडळासाठी निवडणूक संदर्भात उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४ पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला तसेच उत्कृष्ट राज्यस्तरीय सदिच्छा दूत पुरस्कार २०२४ निकिता सालगुडे या विद्यार्थिनीला मिळाला.
या पुरस्काराचे वितरण मुबंई येथे चित्रपट अभ्यासक डॉ. संतोष पाठारे, दिग्दर्शक संदीप सावंत, लेखिका डॉ. निर्मोही फडके, लेखक-समीक्षक प्रा. अभिजित देशपांडे, दिग्दर्शक प्रकाश कुंटे, अभिनेता विकास पाटील, निवडणूक दूत प्रणित हाटे, निलेश सिंगीत, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दाभोळकर, जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई उपनगर) डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थित झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार २०२४ स्वीकारला. उत्कृष्ट राज्यस्तरीय सदिच्छा दूत पुरस्कार २०२४ निकिता सालगुडे या विद्यार्थिनीने स्वीकारला. या प्रसंगी प्रा. डॉ. अंजु मुंडे, प्रा. ऋषिकेश मोरे, राहुल जाधव उपस्थित होते.नोडल अधिकारी म्हणून डॉ. सविता कुलकर्णी यांनी काम पाहिले.
महाविद्यालयाने निवडणूक साक्षरता, मतदार नोंदणीच्या कामात त्यांनी उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. यात मतदार प्रबोधन कार्यशाळा, मतदार जागृती, मतदार नोंदणी, मतदार जागृती रॅली, मतदार जागृती घोषवाक्य स्पर्धा, मतदार जागृती पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, लोकशाही भिंत, मतदार जागृती शपथ, बक्षीस वितरण अशा विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविले.
या कामगिरी बद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार व ए. एम.जाधव यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व निकिता सालगुडे यांचे अभिनंदन केले.

إرسال تعليق