सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : हडपसर पोलीस स्टेशन मधील दामिनी मार्शल महिला पोलिस अंमलदार वैशाली शहादेव उदमले यांना चांगल्या कामगिरीबद्दल महिला व मुली यांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहून कर्तव्यावर असताना काळेपडळ या परिसरातील निर्जन ठिकाणी बेवारस असणाऱ्या चार दिवसाच्या बालिकेचे प्राण वाचवले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक संस्थेकडे सांभाळण्याची जबाबदारी दिली,
शाळा कॉलेजध्ये महिला व मुलींना स्वसंरक्षण बाबत मार्गदर्शन, तसेच सतत पेट्रोलिंग महिला व मुलींच्या समस्या यावर समुपदेशन मार्गदर्शन आशा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे टाइम्स मिरर तर्फे त्यांची निवड करून त्यांना बिग सॅल्यूट २०२४ हा पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते देण्यात आला.
पुणे मिरर चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज शर्मा, द लेक्सीकॉन ग्रुप चे उपाध्यक्ष नीरज शर्मा पोलीस खात्यातील इतर अधिकारी व कर्मचारी सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सिने अभिनेत्री सुरभी हांडे व इतर मान्यवर पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.


إرسال تعليق