सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हवेली : पुण्याच्या पुर्व भागातील लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा येथे ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, सनई चौघड्या, टाळ मृदुंग आणि भजनाचा गजर, त्याचबरोबर रघुपति राघव राजाराम, पतित पावन सीताराम ॥ जय श्रीराम, 'सियावर रामचंद्र की जय....' अशा जयघोषात कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला लोणी काळभोर व परीसरातील नागरिकांनी हजेरी लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जन्मभूमी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोमवारी करण्यात आली. त्यानिमित्ताने देशभरात उत्सव साजरा करण्यात आला.
त्याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तीन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्त गावातील संपूर्ण रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आली होती. लोणी काळभोर येथील दत्त मंदिरापासून सकाळी आठच्या सुमारास देवतांची भव्य मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. या मिरवणुकी दरम्यान तरवडी-रानमळा, केसकरवस्ती व वडकी येथील धनगर समाज बांधवांनी गजनृत्य व सहभाग घेतला.
देवतांची मिरवणूक रामदरा येथे पोहचल्यानंतर रामदरा शिवालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर रामदरा शिवालयात दुपारी १२ वाजता महाआरती महंत हेमंतपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली. श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळा दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी संपन्न झाला. यावेळी भाविकांनी अक्षदा वाहिला. त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
लोणी काळभोर व परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
👉🏻तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम👈🏻
लोणी काळभोरमध्ये मागील तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त रामायण, भजन, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण, संगीतमय सुंदरकांड, रांगोळी, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद व दीपोत्सव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
👉🏻भजनी मंडळांचे भजन अन् प्रासादिक दिंडीचाही सहभाग👈🏻
श्रीराम मंडळ, श्रीमंत अंबरनाथ महिला भजनी मंडळ, श्रीराम महिला भजनी मंडळ, रामाकृषी भजनी, शंकर महाराज बाल भजनी मंडळ, भोसले नाना महिला भजनी मंडळ व तुकाई माता महिला भजनी मंडळ, रायवाडी भजनी मंडळांचे भजन झाले. तर श्रीमंत अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडी काढण्यात आली होती.
राम लक्ष्मण आणि सिताच्या मूर्तीला फुलांची आरास करण्यात आली होती. मंदिरही सुशोभित करण्यात आले होते. लोणी काळभोर येथील रामदरा शिवालयात तब्बल ६० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शनसाठी हजेरी लावली होती. तर लोणी काळभोर ते रामदरा शिवालयाच्या रस्त्यावर सुमारे दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
👉🏻लोणी काळभोर पोलिसांचा बंदोबस्त👈🏻
लोणी काळभोर वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्या बरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांकडून काळजी घेतली व रामदरा शिवालय परिसरात बंदोबस्त ठेवला होता.


إرسال تعليق