धनंजय थोरात (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻पोलीस निरीक्षक पदासाठी पडद्याआड स्पर्धा ?
सांगोला : सद्याच्या सांगोला पोलीस निरीक्षक यांची इतर ठिकाणी पदोउन्नती झाली असून नूतन पोलीस निरीक्षक कोण येणार, याबाबत सांगोला शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. तालुक्याचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता सांगोला पोलीस स्टेशनचा 'कारभारी' क्रियाशील व कायदा, सुव्यवस्थेला प्राधान्य देऊन अवैध धंद्याला लगाम लावणारा असावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.
पो. नि. अनंत कुलकर्णी यांच्या नंतर आपलीच सांगोला पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक पदी वर्णी लागावी, म्हणून काही 'गुडघ्याला बाशिंग' बांधलेल्या इच्छुकांनी वरिष्ठांपासून ते राजकीय लोकांपर्यंत नशीब आजमावत असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये होत आहे.
पोलीस निरीक्षक म्हणून अमुक येणार- तमूक येणार अशी चर्चा नावानिशी होत आहे, कुणी वरिष्ठांकडे तर कुणी राजकीय नेत्याकडे 'माझीच नेमणूक करा' म्हणून पडद्याआड स्पर्धा व धडपड सुरू केल्याचे बोलले जात आहे.
पोलीस निरीक्षक म्हणून कोणी येऊ दे, पण शहर व तालुक्यातील बेकायदेशीर धंदे व व्यवसायाला आळा घालून चोऱ्या, मारामारी रोखून व पोलीस प्रशासनास शिस्त लावणारा 'कारभारी' असावा, अशी सांगोल्याच्या नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नजीकच्या काळात निवडणूकाची धामधूम राहणार आहे, यावेळी राजकीय नेते व पुढाऱ्यांची मर्जी न सांभाळता, येणाऱ्या पोलीस निरीक्षकाने तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी वेळप्रसंगी कठोर भूमिका घेतली पाहिजे, जेणे करून सर्वसामान्य लोकांना 'हाच कारभारी' हवा असे वाटले पाहिजे.

إرسال تعليق