शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"बॅडमिंटन शटल वापरून शनिवार वाड्याची भव्य प्रतिमा : "प्रतिमेची वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली नोंद - अंजली लोटके"


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : अंजली लोटके शटल मास्टर्स बॅडमिंटन अकादमी च्या माध्यमातून ३८२४ बॅडमिंटन शटल वापरून शनिवार वाड्याची सर्वात मोठी प्रतिमा करुन वर्ल्ड रेकॉर्ड नोंद केली, 

            प्रतिमा पाहण्यासाठी खेळाडू, नागरिक व चिमुकल्यांनी मोठी गर्दी केली होती.

           या अनोख्य बॅडमिंटन पासून बनवलेल्या शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन अमनोरा टाऊनशिपचे व्यवस्थापकीय संचालक अनिरूद्ध देशपांडे  यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील उपस्थित होते.



           यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस हडपसर अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष अमर आबा तुपे, संदीप नाना बधे, माजी उपसरपंच रुपेश तुपे , शहर उपाध्यक्ष किरण गाडेकर, संतोष बोराटे आदिंसह खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.

            बॅडमिंटन खेळाचा उगम भारतात झाला आहे, जिथे तो प्रथम पूना शहरात (आता पुणे म्हणून ओळखला जातो) १९व्या शतकाच्या मध्यात खेळला गेला. पुणे हे बॅडमिंटनचे जन्मस्थान आहे. आणि या शहरात बॅडमिंटन शटल वापरून शनिवार वाड्याची सर्वात मोठी प्रतिमा विश्वविक्रम बनली आहे आणि हा विक्रम इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने प्रमाणित केला आहे. 

अंजली लोटके शटल मास्टर्स बॅडमिंटन अकादमीने हा विक्रम केला आहे, दोन दिवस हि प्रतिमा व्यवस्था केली आहे असे आयोजक  राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा क्रिडा सेल आध्यक्ष अंजली लोटके यांनी सांगितले.

           अंजली लोटके शटल मास्टर्स हे पुणे शहरातील सर्वात मोठे बॅडमिंटन कॉम्प्लेक्स आहे. यात खेळाडूंसाठी  हडपसर, वानवडी आणि नांदेडसिटी येथे अनेक बॅडमिंटन कोर्ट आहेत. हे २०१६ पासून सुरू झाले आहे. या अकादमीमध्ये महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. अकादमीच्या प्रमुख अंजली लोटके  या  पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि भारताच्या चॅम्पियन विजेत्या आहेत, 

  ‌          शनिवार वाडा प्रतिमा नागरिकांसाठी २६ व २७ जानेवारी रोजी पाहण्यासाठी सकाळी १० ते संध्याकाळी ०६ वाजेपर्यंत उपलब्ध आहे. अंजली लोटके यांच्या उपक्रमाबद्दल अनिरुद्ध देशपांडे यांनी विशेष कौतुक केले.

           शटल मास्टरच्या टीमने नवीन उपक्रम करून वर्ल्ड रेकॉर्ड केले. खेळाडूसाठी हा सुवर्ण क्षण आहे यामध्ये मेहनत घेतलेल्या सर्वांचेच कौतुक आहे  असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.



Post a Comment

أحدث أقدم