गजानन टिंगरे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बारामती) : उज्वल आरोग्य सेवाभावी संस्था जळगाव सुपे तालुका बारामती जिल्हा पुणे या संस्थेचे संस्थापक बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावचे सुपुत्र जगन्नाथ विठ्ठल जगताप यांच्या कामाचे कौतुक पंचक्रोशी मध्ये होत आहे.
सर्व सामाजिक कार्य हे उज्वल आरोग्य सेवाभावी संस्था जळगाव सुपे बारामती याच्या माध्यमातून होत असतात. पाठीमागील ५ वर्षा पासून दर महिन्याला मोफत पंढरपूर दर्शन यात्रा भाविकांना दिली जाते.
तसेच त्यांना पाच वर्ष पूर्ण झाले असून सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे व संस्थेकडून १०१ गो दानापैकी ९४ गो दान पूर्ण झाले आहे. पुत्रदा एकादशी निमित्त गोदान केले जात आहे. त्याच प्रमाणे मोतीबिंदूचे दहा हजार लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन पूर्ण केले आहेत, ही सर्व सेवा उज्वल आरोग्य सेवाभावी संस्था जळगाव सुपे यांच्या वतीने केली जात आहे.
नावा प्रमाणेच जगाचा नाथ होण्याचे मोलाचे सामाजिक कार्य जगन्नाथ जगताप यांनी कार्य केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


إرسال تعليق