शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नवीन पोलीस चौकीसाठी आयुक्तांना साद.. संस्थापक अध्यक्ष राजे क्लब, अमित पवार


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हवेली : वाढत्या शहरीकरणामुळे शेवाळेवाडी गावाच्या आजूबाजूच्या परिसरात व सोलापूर रोड लगत गुन्हेगारी पाळेमुळे रोवत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत असताना गुन्हेगारी रोखण्याचे खूप मोठे आव्हान पोलिसांसमोर आणि नागरिकांसमोर आहे. 


       हडपसर पोलीस स्टेशन मर्यादेंतर्गत ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. शेवाळवाडी व सोलापूर रोड लगत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी मांजरी बुद्रुक पोलीस चौकीत जावे लागते. शेवाळवाडीपासून हे अंतर जास्त असल्याने नागरिक तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करताना दिसून आले आहे.


          तसेच तात्काळ सेवेच्या वेळी फोन केल्यानंतर आवश्यक पोलीस कुमक येण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस उपयुक्त आर राजा यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले. 


           यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.


           या प्रसंगी राजे क्लब या सामाजिक संस्थेचे सदस्य संजीव पडवलकर, संतोष कदम, विशाल बावणे, विकी धालगडे व राजे क्लब चे संस्थापक अध्यक्ष, शेवाळवाडी मा. उपसरपंच अमित पवार उपस्थित होते. 


         आमच्या परिसरातील सततच्या वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यासाठी शेवाळवाडी परिसरामध्ये पोलीस चौकी असणे नितांत गरजेचे आहे. शेवाळेवाडी, PMPML बस आगार (जुना जकात नाका) येथे पोलीस चौकीसाठी महानगरपालिकेच्या जागेचा पर्याय उपस्थित आहे असे शेवाळवाडी मा. उपसरपंच अमित पवार म्हणाले.

Post a Comment

أحدث أقدم