सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकास अग्निशस्त्राचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्हयातून हद्दपार असलेला म्होरक्या जेरबंद करून तीन गावठी पिस्टल व दोन काडतूस हस्तगत करून एकूण १.२५.२००/- रु. कि.चा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची कारवाई शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरात मुख्य सराफ बाजारपेठेत सुभाष चौकातील जगन्नाथ कोलथे सराफ दुकान दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार नाव भिका एकनाथ पंडीत वय ५० वर्षे रा. शिरूर हे दि. २८/०१/२०२४ रोजी संध्याकाळी २०/३० वा. सुास दुकान बंद करत असताना मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोन इसमांनी अग्नीशस्त्राचा वापर करून सराफ दुकानातील सोने लुटण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान भिका पंडीत यांनी विरोध केल्याने अनोळखी इसमांनी त्यांचेकडील पिस्टल मधून भिका पंडीत यांचे डोकयात पिस्टलचा बट मारला व त्यांचेवर पिस्टलमधून गोळी फायर केली. त्याबाबत भिका एकनाथ पंडीत वय ५० वर्षे, रा. शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुरनं ६८/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०७, ३९८, ३२४, ३४ भा.ह.का.क.३, २५, २७, फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम ३, ७ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण चे वतीने तात्काळ सुरू करणेत आला. अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मार्गदर्शन व सुचना दिल्या.
शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेत गुन्हा घडल्याने व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित आरोपीमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे वर्णनाचा इसम असल्याचे प्रामिक तपासात निष्पन्न झाले. गोपनीय माहितीचे आधारे सदरचा गुन्हा हा गुन्हेगार नामे शरद बन्सी मल्लाव रा. शिरूर ता. शिरूर जि पुणे याने त्याचा साथीदार नामे सागर ऊर्फ बबलु दत्तात्रय सोनलकर रा. धायरी पुणे याचे मदतीने केला असल्याचे समजले. या आरोपींवर लक्ष केंद्रीत केले असता, आरोपी हे सिंहगड किल्ल्याचे जंगलात लपून बसले असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सिंहगड किल्ला परीसरातील जंगलातून गुन्हयातील मुख्य आरोपी नामे शरद बन्सी मल्लाव वय २४ वर्षे, रा. काची आळी, शिरूर ता शिरूर जि पुणे यास पकडण्यात आले. त्याचेकडून तीन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूस व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १,२५,२००/- किंचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. तसेच त्याचा साथीदार सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर वय २३ वर्षे रा. धायरी पुणे हा जखमी असून तो ससून हॉस्पीटल पुणे येथे उपचार घेत असल्याने त्यास अटक करणेत येणार आहे.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील असून आरोपी शरद मल्लाव याचेवर शरीराविरूद्धचे व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगण्याबाबतचे एकूण ७ गुन्हे दाखल असून सदर आरोपी हा पुणे ग्रामीण जिल्हा व अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करणेत आलेले आहे. तसेच आरोपी सागर ऊर्फ बबलु सोनलकर याचेवर शरीराविरूद्धचे ०२ गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.स.ई. गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे तसेच शिरूर पोस्टे चे पोसई एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे.
आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास पो.नि. ज्योतीराम गुंजवटे व पो.स.ई. एकनाथ पाटील हे करत आहेत.


إرسال تعليق