शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मराठी पत्रकार परिषद संलग्न हवेली तालुका पत्रकार संघाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न...!


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : मराठी पत्रकार परिषद संलग्न हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांचा हळदी कुंकू हा कार्यक्रम लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथील मराठी पत्रकार संघातील महिला सदस्यांनी आयोजित केला होता. 



      या हळदी कुंकू कार्यक्रमाला लोणी काळभोर, कदमवाकवस्ती परीसरातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. हळदी कुंकू कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळ येथील हॉल मध्ये घेण्यात आला. या हळदी कुंकू कार्यक्रमाला पत्रकार संघाचे संघटक राम भंडारी यांनी त्यांच्या वाढदिवसाला होणारा खर्च कार्यक्रमासाठी दिला. असे हवेली तालुका अध्यक्ष रमेश निकाळजे यांनी सांगितले. 



           हवेली तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारणीची निवड होऊन फक्त सातच महिने झाले असता या सात महिन्यामध्ये पत्रकार संघाच्या वतीने अंगणवाडीच्या कुपोषित बालकांना सकस आहार तसेच औषधं वाटप करण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुका पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. 


             यावेळी पत्रकार संघातील सर्व सदस्य तसेच जवळपास दोनशे नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य शिबिराचा कार्यक्रम हवेली तालुक्याचे जेष्ठ पत्रकार नाथाभाऊ उंद्रे यांच्या तसेच पुणे जिल्हा संघटक श्रावणी कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला होता. तसेच पत्रकार दिनाच्या दिवशी पत्रकार दिन हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने लोणी काळभोर येथील ऑफिस येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतीत संपन्न झाला होता. हवेली तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येत असतात. येणार्या काळात सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष रमेश निकाळजे यांनी यावेळी सांगितले. 


तालुका उपाध्यक्ष स्वप्नील कदम, कोषाध्यक्ष संजय कुलूत, संघटक फकीर इनामदार, राम भंडारी, शहाजी मिसाळ, नामदेव घळगे, रुपालीताई काळभोर, तृप्तीताई कसबे तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

أحدث أقدم