सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : अनेक अडथळ्यांनंतर थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली. ९ मार्च रोजी मतदान आणि १० मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. सोमवार पाच फेब्रुवारीपासून नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
पुणे शहारातील शिवाजीनगर येथील उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करता येणार आहे. १२ फेब्रुवारी दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १३ ते २७ फेब्रुवारी या कालावधित उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे
९ मार्चला मतदान होणार आहे तर १० मार्चला मतमोजणी व निकाल घोषित केला जाणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. शीतल पाटील, उपनिबंधक सहकार संस्था, पुणे शहर या काम पाहणार आहेत.

إرسال تعليق