शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बिर्याणी आणि चिकन शॉपला मध्यरात्री आग लागली : सातववाडी


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : हडपसर सातववाडी येथे बिर्याणी आणि चिकन शॉपला  मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

 


         मा. नगरसेवक सुनिल बनकर यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलास वेळीस कळविल्याने मोठा अनर्थ टळला.



          आग लागल्याची माहिती मिळताच काळे बोराटे नगर अग्निशमन केंद्राचे जवान केंद्र प्रमुख अनिल गायकवाड ड्रायव्हर राजू शेख, फायरमन अनिमेष कोंडगेकर, केतन गाडगे, संकेत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीतून एक लिकेज सिलेंडर, एक चांगला सिलेंडर बाहेर काढून परिसरात होणारी मोठी घटना टाळली. 



         याआधी अगोदर एक छोटा सिलेंडर फुटला होता, सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी अथवा जीवीत हानी झाली नाही.


              हडपसर आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन केंद्राचे जवान ड्रायव्हर नारायण जगताप, फायरमन बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, नितेश डगळे यांच्या मदतीने दोन्ही ही बाजूने पाणी मारून आटोक्यात आणली. जवळपास ही आग आटोक्यात आणण्यासाठी अर्धा तासाचा एतका वेळ लागला. चिकन शाॅप शेजारील इतर दुकाने या घटनेत वाचली व मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

أحدث أقدم