सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : मकर संक्रांती सणा निमित्त भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन आयोजित आणि सोनी ज्वेलर्स पुरस्कृत ' हळदी कुंकू समारंभ ' व ' होम मिनस्टर खेळ रंगला पैठणीचा ' कार्यक्रम स्मिता तुषार गायकवाड यांच्या संयोजनातून हडपसर गावठाण येथे जल्लोषात संपन्न झाला.
हडपसर परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा महिला संयोजिका डॉ. उज्वला हाके, माजी नगरसेविका श्रीमती रंजना नानी टिळेकर, भाजप शिरूर लोकसभा महिला संयोजिका माधुरी गिरीमकर, माजी नगरसेविका उज्वला जंगले, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, महिला आघाडी उपाध्यक्ष वंदना कोद्रे, आर. पी. आय. च्या महिला आघाडी पुणे शहर अध्यक्षा श्रीमती शशिकला ताई वाघमारे, माजी नगरसेविका विजया वाडकर, सोनी ज्वेलर्सचे नवीन वर्मा, भाजपा पुणे जिल्हा सचिव धनराज गवळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, भाजप महिला मोर्चा पुणे शहर सरचिटणीस भावना शेळके, भाजप महिला मोर्चा हडपसर विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा शोभा लगड, उपाध्यक्ष पुणे शहर ओबीसी मोर्चा भाजपा पल्लवी केदारी, चिटणीस पुणे शहर ओबीसी मोर्चा भाजपा गोविंद कंगने, पुणे शहर ओबीसी मोर्चा श्रीदेवी कानीकर, दामिनी पथकाच्या वैशाली उदमले, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष संगीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते नलिनी मोरे, हडपसर विधानसभा उपाध्यक्ष अलका शिंदे, सामाजिक कार्यकर्त्यां सौं शीतल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी ' होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा ' ह्या सांगीतिक कार्यक्रमाने उपस्थित महिला वर्गाची मने जिंकली. या खेळातील विजेत्या महिलांना पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
....प्रथम क्रमांक - सौ. शैलजा नाईक.
....द्वितीय क्रमांक - सौ. विशाखा सुतार.
.....तृतीय क्रमांक - सौ. मुक्ता सूर्यवंशी .
यावेळी अनेक भव्य गृहोयोगी वस्तू लकी ड्रॉ बक्षीसे ही देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका स्मिता गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार गायकवाड यांनी केले. दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन रऊफ शेख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्मितसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्या आशा भूमकर, विमल वागलगावे, अनिता धाबेवार, मेघना ननावरे, साक्षी सूर्यवंशी, निवेदिता रासगे, सारिका देशमुख, शीला भास्करती, मंगल नवसुपे, उर्मिला प्रभुणे, वैशाली पाटील, सुनीता पाटील, सुशीला चौरे, संगीता हरपळे, काशिनाथ भुजबळ, सुनीता सैदाने यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमास ' सोनी ज्वेलर्स ' हडपसर व धनराज गवळी यांचे विशेष सहकार्य लाभले.




إرسال تعليق