शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शिव सन्मान सोहळा संपन्न : फुरसुंगी

शिव सन्मान सोहळा; ग्रंथालय, अभ्यासिका वाचनालय तसेच निवासी वस्तीगृह उभारण्याचा निश्चय..


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : फुरसुंगी गावामध्ये सुसज्ज ग्रंथालय अभ्यासिका वाचनालय तसेच निवासी वस्तीगृह उभारण्याचा निश्चय शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने करण्यात आला.


             यावेळी उत्तम कामठे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार सोहळा फुरसुंगी मध्ये संपन्न झाला 


        अखिल फुरसुंगी शिवजयंती उत्सव व शिवधर्म सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीच्या अवचित्य साधून गावातील कोहिनूर हिऱ्यांचा शोध घेऊन त्या हिऱ्यांना खऱ्या अर्थाने घडवणाऱ्या त्यांच्या मातापित्यांचा छत्रपती शिवाजी महाराज जीवन पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख फुरसुंगी गावांमध्ये शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून पाहावयास मिळाली.


            गावातील उच्चशिक्षित तरुण आर्किटेक इंजिनियर तथा बांधकाम व्यवसायिक किरण वसंतराव पवार  प्रसिद्ध आर्किटेक इंजिनियर प्रभाकर रामदास कामठे युरोप देशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपल्या भागामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर स्वप्नील सुनील भाडळे तसेच एमपीएससी स्पर्धा परीक्षा माध्यमातून उत्तुंग यश प्राप्त करून प्रशासकीय अधिकारी नेमणूक झालेले निखिल अंकुश लांडगे या सर्वांच्या मातापित्यांना आदर्श माता पिता अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला 


          तसेच फुरसुंगी गावातील लहान मुले यांनी आपल्या घरोघरी शिवजयंती सजावट स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवला अशा विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ अशा पद्धतीने पुरस्कार देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम देखील यावेळी करण्यात आले.


           फुरसुंगी गावामध्ये सुसज्ज ग्रंथालय वाचनालय अभ्यासिका उभारण्याचे काम आगामी काळामध्ये  गावात उभारायचे आहे हे देखील सांगितले अनेक अधिकारी गावात निर्माण झाले पाहिजे  या कार्यामध्ये गावातील तरुणांनी व शिवव्याख्याते यांनी भरीव अशी मदत करू असे याप्रसंगी सांगितले तसेच यावेळी शिवव्याख्याते प्रबुद्ध साठेसर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. ते म्हणाले कुळवाडी बहुजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य मध्ये १८ पगड जातीचे लोक महाराजांनी आपल्याजवळ बाळगले होते कारण जे पूर्वीचे क्षत्रिय जे होते ते अदिलशहा निजामशहा औरंगजेब यांच्या दरबारात चाकरीत मग्न होते म्हणून तर शिवबांनी आपल्या बारा मावळातील सवंगड्यांना मग ते सवंगडे कोणत्या जातीचे आहे कोणत्या धर्माचे आहे हे महाराजांनी कधी पाहिलं नाही त्या सवंगड्यांच्या हाती तलवारी देऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्या सवंघड्यांनी देखील महाराजांच्या जीवाला कधी धोका पोहोचू दिला नाही व महाराजांचे रक्षण त्याचबरोबर स्वराज्याचे रक्षण त्यांनी प्रामाणिकपणे चोख पाडले प्रामुख्याने सांगितले शिवचरित्राचा खरा इतिहास जनतेसमोर मांडताना साठे सर यांनी इतिहासातील अनेक दाखले देऊन जणू काही शिवशाहीच जिवंतच करून दाखवले. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक खुशबू तिवारी, दिनेश लोखंडे, यांनी छत्रपती शिवाजी चरणी अभिवादन करण्यासाठी १०८ वह्या व २०० पेन अर्पण केले तसेच निखिल लांडगे यांच्याही परिवाराने वह्या  व पेन शिवचरणी या सर्व जमा झालेल्या आगामी काळामध्ये गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार. 


          या कार्यक्रमाचे आयोजन अखिल फुरसुंगी शिवजयंती उत्सव व शिवधर्म सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष उत्तमबापू कामठे विजय गुंड सुनील भाडळे मारूती काळे योगेश शिंदे रवी कामठे उज्वला कामठे शिवांजली कामठे आदेश खटाटे यांनी केले होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उत्तम बापू कामठे यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم