शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती कार्यक्रम : सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघांमध्ये..

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती कार्यक्रम.....


गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


बुलढाणा (सिंदखेडराजा) : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यांत्राबाबत जनजागृती आणि प्रात्याक्षिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात येत आहे. 


           ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रात्याक्षिक मोहिमेचा शुभारंभ १० डिसेंबर २०२३ पासून ते २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सिंदखेड राजा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर दाखविण्यात येत आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन जनजागृती कार्यक्रमाद्वारे सर्वसामान्य मतदार, नवयुवक व युवती यांना मतदान प्रक्रियेची माहिती होण्यासाठी याचा फायदा होणार आहे.


             तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी मा. भारत निवडणूक आयोगाचे दिनांक १ जानेवारी २०२४ या अहर्त दिनांकावर मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केलेला होता व त्याबाबतची अंतिम मतदार यादी दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्द करण्यात आलेली आहे.


              आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा कसे हे तपासावे, नाव नसल्यास किंवा सदर पुनरीक्षण कार्यक्रमात चुकीने नाव कमी झाल्यास त्या मतदारांनी तात्काळ आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयात नमुना ६ भरून देण्यात यावा असे आवाहन समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी २४ सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघ यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم