"बालप्रबोधनकार प्रांजली ने आदर्श गावात रुजवला पर्यावरणाचा संदेश पर्यावरणाचा ऱ्हास बालकांची भविष्य कोमेजून टाकणारी समस्या"
गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (पाटोदा) : भविष्यातील प्रश्नांना सर्वसमावेशकतेने भिडण्याची गरजच न वाटणाऱ्या देशांची संख्या अधिक असल्याची ही माहिती जगाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहे.
भारतासारख्या देशांत तर असे काही मुद्दे असतात आणि त्यासाठी भविष्याचा वेध घेणारी ध्येयधोरणे आखायची असतात, याबद्दलच आनंद असल्याने भावी पिढीचा उल्लेख केवळ स्वार्थापलीकडे जाऊ शकत नाही. वास्तव स्वीकारण्याचीही कुणाची तयारी नसल्याने, धोरणांमध्ये सतत मूलभूत स्वरूपाचे बदल करून मुलांच्या भविष्याची गुंतागुंत वाढत चालल्याचे दिसते आहे. संयुक्त राष्ट्रांची बाल- हक्कांची सनद केवळ कागदावरच राहिल्याने ती हास्यास्पद ठरू लागल्याची स्थिती कुणालाही अवघडायला लावणारी आहे. पर्यावरण असंतुलनाबाबत ग्रेटा थुनबर्ग या शाळकरी मुलीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत दिलेली हाक जगातल्या अनेक सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशीलतेला आवाहन करणारी असली, तरीही प्रत्यक्षात त्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक असणारे निर्णयचापल्य दाखवण्यात कुणाला फारसा रस नाही, असे दिसते.
‘पर्यावरणाचा ऱ्हास ही उद्याची समस्या आहे, त्यामुळे आत्ता, या क्षणी त्याकडे फार गांभीर्याने पाहिले नाही तरी चालेल,’ ही वृत्ती जगातील सगळ्या बालकांचे भविष्य कोमेजून टाकणारी आहे. असे मत बाल प्रबोधनकार शिवश्री प्रांजली जाधव हिने व्यक्त केले.
आदर्श गाव पाटोदा येथे भास्करराव पेरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानात ती बोलत होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील हे प्रारंभी ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड आळंदी देवाची यांच्या भारूडाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी प्रांजलीने खड्या आवाजात पर्यावरणावर आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान भास्करराव पेरे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रांजलीचे आजोबा केंद्रप्रमुख राजेंद्र जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गाडेकर यांनी केले.


إرسال تعليق