तहसीलदार जैस्वाल यांनी केले अवैद्य रेतीचे छुपे रस्ते बंद! सिंदखेडराजा
गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध रेती व इतर गौणखनिज उत्खनन व वाहतुक करणे करीता तयार करण्यात आलेले राहेरी बु, व हिवरखेडपुर्णा येथील अवैध छुपे रस्ते आज दि. २३/०२/२०२४ रोजी बंद करण्यात आले.
तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील ईतर अवैध गौणखनिज वाहतुकीसाठी असणा-या छुप्या रस्याचा शोध घेऊन रस्ते तोडण्याची कार्यवाही सुरु केली.
सिंदखेडराजा तालुक्यातील अवैध छुपे रस्ते तोडल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुकीवर पुर्णतः आळा बसलेला आहे. तसेच आवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक होणार नाही या करीता तालुक्यामध्ये मंडळ अधिकारी व तलाठी यांचे पथक गठीत करण्यात आले आहे त्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुक मोठ्या प्रमाणावर बंद झालेली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांविरुध्द मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई केल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतुक करणा-यांच्या मनामध्ये महसुल प्रशासनाचा धाक बसला आहे.


إرسال تعليق