शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी दत्ताराम बागवे यांची नियुक्ती : लोणी काळभोर पोलीस ठाणे...


 पुणे हवेली : लोणी काळभोर ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पदी दत्ताराम गोपीनाथ बागवे यांची नियुक्ती झाली.पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता.१३) आदेश जारी केले.


             यापुर्वीचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांची फेब्रुवारी महिन्यात बदली झाली हे पद रिक्त असल्याने. आता त्यांच्या जागेवर विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी नियुक्ती करण्यात आली.


            दत्ताराम बागवे यांची प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नियुक्ती करण्यात आली. 


            दत्ताराम बागवे यांनी वारजे माळवाडी, उत्तम नगर व विशेष शाखेत कार्यरत होते. या पुर्वीचा अनुभव पाहता लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीलाआळा बसेल  यात शंका नाही. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.

Post a Comment

أحدث أقدم