माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यती साई मंदिरासमोर जाधववाडी, फलटण येथे भरविण्यात आल्या असून या बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बैलगाडा विजेत्यांच्या बक्षीस समारंभानंतर त्याच ठिकाणी गौतमी पाटील हीचा लावणी शो होणार आहे. सबसे कातिल गौतमी पाटील... हा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि गर्दी हे समीकरणच झाले आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गौतमी पाटील हिचे कार्यक्रम झाले आहेत. शहरांमध्ये नव्हे तर ग्रामीण भागातही कार्यक्रम होत आहेत. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे बंदोबस्त लावून कार्यक्रम घेतले जात आहेत. आतापर्यंत सार्वजनिक कार्यक्रम, वाढदिवसा निमित्तही गौतमी पाटील हिला बोलावले जात आहे. मात्र आता गौतमी पाटील थेट बैलगाडा शर्यतीच्या मैदानात दिसणार आहे.
अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरशः गर्दी करतात. गौतमी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. गौतमी पाटील हिच्याबद्दल एक क्रेझ लोकांमध्ये बघायला मिळते. गौतमी पाटील हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त फॅन फॉलोइंग ही बघायला मिळते. गौतमी पाटील हिचा डान्स म्हटले की, लोक मोठी गर्दी करतात. फलटण तालुक्यातील रसिकांसाठी अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारा नृत्यांगना गौतम पाटील हिचा कार्यक्रम फलटण येथे होत असल्याने गौतम पाटील हिच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला आहे.

إرسال تعليق