संग्रहित फोटो
..यशवंत'च्या मतमोजणीला उशीर प्रतिनिधी व कार्यकर्ते सोडण्यावरून घोषणाबाजी...
सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : हवेली तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीदरम्यान प्रतिनिधी सोडण्यावरून महाविद्यालयाच्या गेटवर प्रचंड गोंधळ सुरु असल्याचे व्हिडीओ मध्ये पाहता येईल.
चुकीच्या नियोजनामुळे प्रतिनिधी, व कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी असून, उपस्थित नागरिक गेटवरच घोषणा देत आहेत.
पोलिंग एजंट व अर्धे उमेदवार बाहेर असून, या ठिकाणी उपस्थित असलेले उमेदवार निषेध घोषणा देत आहेत. या वेळी जे उमेदवार व पोलिंग एजंट आहेत ते अजूनही बाहेरच आहेत. या प्रकारामुळे मतमोजणीला उशीर होत आहे.
या संदर्भात इलेक्शन ड्युटी आॅफिसर शितल पाटील भोसले यांच्याशी संपर्क साधला असता असा कुठलाही गोंधळ नसल्याचे स्पष्ट केले..

إرسال تعليق