खुनाचे गुन्हयातील सराईत गुन्हेगार अवैध विनापरवाना गावठी पिस्टल बाळगले प्रकरणी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा ; पुणे ग्रामीणची कारवाई
पुणे (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना मा पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिलेल्या आहेत.
दिनांक 8/3/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सराईत गुन्हेगार पवन थोरात रा. मंचर हा त्याच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्टल कमरेला लावून मोटरसायकल वर बसूननारायणगाव - मांजरवाडी रोड ला येणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकाने मिळाले बातमीचे ठिकाणी जाऊन सापळा रचून एका संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पवन सुधीर थोरात वय 24 वर्षे, रा. चाळीस बंगला रोड, मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे असे सांगितले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले असून मोटार सायकलसह एकूण 61,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी पवन सुधीर थोरात रा. मंचर याचे विरोधात खूनाचे ०२ गुन्हे, खुनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अॅक्ट अंतर्गत एकूण ०९ गुन्हे दाखल असून त्याचेवर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत देखील कारवाई करणेत आलेली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो.स.ई. अभिजित सावंत, पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. विक्रम तापकीर, पो.हवा. राजू मोमीन, पो.हवा. अतुल डेरे, पो.ना. संदिप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. निलेश सुपेकर यांनी केलेली आहे.

إرسال تعليق