मंडलाधिकारी जयश्री कवडे यांच्यासह दोन खाजगी इसम, ७ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले...
पुणे (हवेली) : थेऊर येथील महसूल खात्यातील लाचखोर मोठा मासा, थेऊरच्या भ्रष्ट, लाचखोर मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना व त्यांच्या खाजगी दोन इसमांना ७ हजारांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
लोकसेविका जयश्री कवडे व त्यांचे खाजगी इसम योगेश कांताराम तातळे (वय २२, खाजगी संगणक ऑपरेटर रा. चौधरी पार्क, बाबु कदम चाळ, दिघी) व विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८ वर्ष, व्यवसाय एजंट, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी एका २५ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जयश्री कवडे व त्यांचे दोन खाजगी इसम योगेश तातळे व विजय नाईकनवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.
हवेलीत महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून महसूल विभागात लाचखोरी विरोधात कारवाई होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंतेचा विषय आहे. असा की लोकसेवक जर लाच घेत असेल तर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे यित शंका नाही. या संदर्भात वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

إرسال تعليق