(किरकटवाडीत शेती मालात अंमली पदार्थाच्या निर्मितीसाठी अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड करून उत्पादन घेणारे दोन इसम घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीस स्टेशन पोलीसांची कारवाई...)
पुणे हवेली, (प्रतिनिधी) : अंमली पदार्थ वनस्पतींची बेकायदेशीर लागवड करून उत्पादन घेऊन विक्री केल्यामुळे या कालावधीत झटपट पैसा कमविता येतो. अशी धारणा लोकांमध्ये तयार झाली आहे.
यातूनच कायद्याचे उल्लंघन करून काही लोक शेतीचे नावाखाली शेती मालात अफु, गांजा सारख्या अंमली पदार्थ निर्मिती करणाऱ्या वनस्पतींची बेकायदेशीरपणे विनापरवाना लागवड करून उत्पादन घेत आहेत.
पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवत अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना केले होते.
दि. १२/०३/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे किरकटवाडी ता. हवेली जि पुणे गावातील व्यक्ती नाव तानाजी शांताराम हगवणे व शिवाजी बबन हगवणे यांनी त्यांचे शेतात विनापरवाना बेकायदेशीरपणे अफुची लागवड करून उत्पादन घेतले आहे, अशी बातमी मिळाली होती.
सदर बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, हवेली पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व स्टाफ असे वरीष्ठ अधिकारी यांचे आदेश व परवानगीने तसेच राजपत्रीत अधिकारी व पंचांसह जावून मौजे किरकटवाडी गावातील नांदोशी रोड लगत इंद्रप्रस्थ सोसायटीचे जवळील शेतात जावून पाहणी करून कारवाई केली असता, शेतामध्ये उपस्थित व्यक्ती तानाजी शांताराम हगवणे वय ४८ वर्षे, व शिवाजी बवन हगवणे वय ५५ वर्षे, दोघे रा. किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांनी शेतांमध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले, अफुची लागवड केलेली दिसून येवू नये याकरीता शेतात कांदा पिकाची लागवड करणेत आलेली होती. सदर ठिकाणी १४.४५० किलो ग्रॅम वजनाची अफुची बोंडे असलेली एकूण ११७८ झाडे किं.रु. २८,७००/- ची जप्त करणेत आलेली आहेत. सदर दोन्ही इसमांविरोधात हवेली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ६८/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट, क. ८ ब, ८क, १७ क प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, हवेली विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलीस स्टेशनचे पो.नि. सचिन वांगडे, स्था.गु.शा.चे सपोनि राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, दत्ता तांबे, दगडू विरकर, हवेली पो स्टे कडील सपोनि विकास अडागळे, पोलीस अंमलदार दिलीप आंबेकर, अशोक तारू, गणेश धनवे, संतोष भापकर, रजनीकांत खंडाळे, सचिन गुंड, मकसुद सय्यद यांनी केली.
असून या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विकास आडागळे हवेली पोलीस स्टेशन हे करत असून गुन्हयातील दोन्ही आरोपींना अटक करणेत आली असून मा. न्यायालयात हजर करणेत येणार आहे.

إرسال تعليق