शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भीम कन्या रॅलीचे आयोजन : दौंड

 भीम कन्या रॅलीचे आयोजन : दौंड 


डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (दौंड) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती दौंड मध्ये उत्साहात संपन्न झाली.



            डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची जयंती दौंड मध्ये भीम कन्या ग्रुप यांनी आयोजित केली होती यामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेतला होता जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भीम कन्या रॅलीचे आयोजन केले होते.



 या रॅलीला तीन वर्षे पूर्ण झाले असून भीम कन्या ग्रुपचे अध्यक्ष व भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा महिला आघाडी सचिव रोहिणी ढवळे उपाध्यक्ष व सचिव ज्योती मोकळ आशाताई मोहिते पोलीस पाटील मसनेरवाडी अश्विनी बगाडे सविताताई सोनवणे पोलीस पाटील  नीता वाघमारे आणि लता साळवे 

माधुरी ढवळे करुणा शिंदे समृद्धी कसबे यांचे मार्गदर्शन रॅलीला झाले. रॅली ची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले आणि राजश्री शाहू महाराज यांच्या यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. भीम कन्या रॅली या उपक्रमांमधून संपूर्ण मानव जातीला एकात्मतेचा संदेश देऊन मानवी जीवन सफल व्हावे यासंबंधी समुपदेशन करण्यात आले 



             दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनुराधा गायकवाड, जयश्री माने शिल्पा शिदगणे, भाग्यश्री चिकटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संदीप ढवळे, सागर मोकळ, सचिन कुलथे, राहुल कडाळे. या सर्वांच्या सहकार्याने भीम कन्या रॅली च्या माध्यमातून जयंती महोत्सव संपन्न झाला.



Post a Comment

أحدث أقدم