शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राज्य स्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत विजय कृष्णा थोरात यांची रोप्य पदकास गवसणी ; माळशिरस

 राज्य स्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत विजय कृष्णा थोरात यांची रोप्य पदकास गवसणी ; माळशिरस


डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


सोलापूर : कराड येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा कराड चषक २०२४ मध्ये १० वर्षाखालील वयोगटांमध्ये माळशिरस येथील एका सर्व सामान्य कुटुंबातला विजय कृष्ण स्वाती नवनाथ थोरात यांनी दुसरा क्रमांक मिळवून रोप्यपदक पटकावले.



            अर्जुन पुरस्कार विजेते देवतळे यांच्या हस्ते विजय कृष्ण यास रोप्य पदक देण्यात आले या स्पर्धेत स्पर्धक पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यादेवी नगर येथून आले होते. 



              ग्रामीण भागातील विजय कृष्ण थोरात यांनी वयाच्या आठ वर्षापासून खेळण्यास सुरुवात केली त्याल आवड असल्याने मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणी प्रमाणे आई स्वाती आणि वडील नवनाथ थोरात यांनी परिस्थितीचा विचार न करता मुलगा विजय कृष्ण यास प्रोत्साहन दिले.



            आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविण्यात विजय यास यश आले. या यशाने माळशिरस परिसरात विजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

أحدث أقدم