..अज्ञात व्यक्तीने जाळलेली दुचाकी यावर अमोल राजपुत यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली..
डॉ गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर (वालचंदनगर) : वालचंदनगर येथील मेन काॅलनीतील जी-२ येथे रात्री २:३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी गाडीला आग लावून जाळण्यात आली.
वालचंदनगर येथील प्रतापसिंग उर्फ अमोल राजपूत यांच्या घरा समोर लावलेली दुचाकी क्रमांक एम.एच.४२ ए.यु. ०३७७ या टी.व्ही.एस.कंपनीच्या ज्युपेटर गाडीला अज्ञातांनी आग लावून पेटवून दिली.
या संदर्भात वालचंदनगर येथील मेन काॅलनीतील जी-२ येथे राहत असलेल्या राजपूत यांनी संध्याकाळी सदरील दुचाकी घरा समोर लावली होती. रात्री १२:३० वाजेपर्यंत दुचाकी घरा समोरच पार्क केली होती. मात्र मध्यरात्री ०२:३० वाजण्याच्या सुमारास राजपूत यांच्या पत्नी लहान मुलीला पाणी पाजण्यासाठी उठल्या असता घरासमोर आग लागल्याचे निदर्शनास आले हि बाब त्यांनी अमोल राजपूत यांना तात्काळ सांगीतल्यावर राजपूत बाहेर येऊन पाहिले असता अज्ञात इसमाने त्यांच्या दुचाकीला आग लागल्याचे दिसले.
सदरील आग पाणी टाकून विझवण्यात आली मात्र तोपर्यंत गाडी जळुन पुर्ण खाक झाली यात टु व्हिलर गाडीचे मोठे नुकसान झाले.
या विषयी वालचंदनगर पोलिस स्टेशन मध्ये भारतीय दंड संहिता कलम ४३५ अंतर्गत दिनांक २१.०५.२०२४ रोजी फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक महेश एम. पवार करीत आहेत.
या अज्ञातां विरोधात पोलीस कसून तपास करत असुन गाडी पेटवणार्याला लवकरात लवकर पकडुन कडक कारवाई करण्यात यावी अशी गाडी मालक अमोल राजपुत यांनी पोलीसांना सांगितले.



إرسال تعليق