महाराष्ट्र पोलित न्युज 24
महाराष्ट्र प्रतिनिधी :अतुल सोनकांबळे
नाशिक : शहरात गुन्हेगारीच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. आज पंचवटीतील दिंडोरी रोडवरील गुलमोहर नगर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळ स. ११ ते ११. ३० वा. सुमारास एका वृध्द महीलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली.
कुसुम सुरेश एकबोटे (वय ८०) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेची खबर मिळताच पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास मसरूळ पोलीस करीत आहे
إرسال تعليق