शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंदापूर तालुक्यात सामान्य नागरिकांची दाखल्यांसाठी धावपळ.



इंदापूर तालुक्यात सामान्य नागरिकांची दाखल्यांसाठी धावपळ. 

निमगाव केतकी मधील म्होरक्या वेळेवर दाखले सोडेना.

इंदापुर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे

इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सामान्य नागरिकांनी तहसील कार्यालयासह तालुक्यात ठिकठिकाणी असलेल्या महा-ई-सेवा केंद्रांमध्ये गर्दी केली आहे. कारण राज्य शासनासह स्थानिक पातळीवर शिक्षणासाठी लागणारे दाखले लोकांना वेळेवरती मिळत नसल्याने लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यातच सर्व दाखले निमगाव केतकी मधील एका व्यक्तीकडून सुटत असल्याने सदर व्यक्तीची मनमानी वाढल्याने  वशिल्यावरती दाखले सोडत असल्याचे बोलले जात आहे.


इंदापूर तालुक्यात अनेक गावांमध्ये महा-ई-सेवा केंद्र आहेत. तसेच तहसील कार्यालयामध्ये हे नागरी सुविधा केंद्र आहे. या सर्व ठिकाणाहून त्या त्या भागातील लोक महसूल विभागाशी संबंधित सर्व दाखले काढतात. मात्र इंदापूर तालुक्यात सद्यस्थितीला अनेक दिवस झाले तरी लोकांना आपले दाखले वेळेवर मिळत नसल्याने लोकांमध्ये महसुली विभागाच्या कामाविषयी प्रचंड नाराज आहेत. तालुक्यातील काही महा-ई-सेवा केंद्राचे दाखले ज्या त्या तारखेला सुटतात तर काही महा-ई-सेवा केंद्राची दाखले जाणून बुजून आठ ते दहा दिवस पेंडिंगला ठेवले जात असल्याचे सद्यस्थितीला दिसून येत आहे.

या सर्व बाबींना निमगाव केतकी मधील दाखले सोडणारा म्होरक्या जबाबदार असून त्याला प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. शेटफळगडे येथील एका महा-ई-सेवा केंद्र वाल्याचा पासवर्ड व लॉगिन आयडी निमगाव केतकी मधील व्यक्ती वापरत आहे. तो व्यक्ती इंदापूर तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्राचे तसेच इंदापूर मधील नागरी सुविधा केंद्राचे दाखले सोडण्याचे काम करतो.

त्यामुळे सध्याच्या स्थितीला इंदापूर तालुक्यात सर्वसामान्य लोकांचे शेकडो दाखले पेंडिंग ला आहेत. तसेच निमगाव केतकी मध्ये किती अधिकृत महा-ई-सेवा केंद्र आहेत हे प्रशासनाला पहिल्यांदा तपासावे लागणार आहे. जी व्यक्ती दुसऱ्याच्या नावावरती महा-ई-सेवा केंद्र चालवत आहे त्या व्यक्ती वरती तातडीने कारवाई करण्यात यावी व सर्वसामान्य लोकांचे दाखले वेळेवरती सोडवण्यात यावेत. अन्यथा इंदापूर तालुक्यात दाखल्यांच्या कारणावरून सामान्य नागरिक उपोषणाला बसू शकतात.

Post a Comment

أحدث أقدم